न्यू इंग्लिश मिडियम ला उपक्रमशील शाळा पुरस्कार

न्यू इंग्लिश मिडियम ला उपक्रमशील शाळा पुरस्कार

विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडियम स्कूल ला बारामती शहर भारत स्काऊट गाईड या संस्थेच्या वतीने उपक्रमशील शाळा सर्वाधिक खरी कमाई करणारी शाळा तसेच सर्वाधिक पथक नोंदणी करणारी शाळा अशा तिहेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बारामती येथील आर एन टेक्निकल हायस्कूल येथे झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात हे तिन्ही

पुरस्कार प्रदान करण्यात आले. स्काऊट गाईड चळवळीतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिवाई कदम यांना उत्कृष्ट गाईडर पुरस्काराने गौरविण्यात आले.  संस्थेतर्फे शाळेतील स्काउट गाईड राज्य पुरस्कार प्राप्त 19 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. स्काउट राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थी स्वयम गांधी, दिग्विजय कदम, पृथ्वीराज कपूर,  दुर्गेश कुलकर्णी,  श्रेयस शिंगाडे, दिग्विजय ताम्हाणे, सुजित भोंगळे,  प्रतीक लोंढे,  जयदीप आव्हाळे,  सुयश पवार, सोहम गांधी.  गाईड राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी  श्रावणी परकाळे , संस्कृती सिंग, गायत्री चौधर,  श्रावणी भोसले,  प्रगती शिंदे, किरण माने, गौरवी भापकर, रेणिका देवरकर त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्रमोद जोतावर,  संतोष कदम,  शिवाई कदम व रूपाली लाळगे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.  राज्य पुरस्कार प्राप्त स्काऊट पृथ्वीराज कपूर,  गाईड प्रगती शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या पुरस्कार वितरण प्रसंगी बारामती शहर भारत स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष सचिन सातव,  उपाध्यक्ष सागर आटोळे.  बबन गायकवाड, उपाध्यक्ष संगीताताई ढवाण, कार्याध्यक्ष जे. पी. जगताप,  सचिन तात्यासाहेब माने,  प्रशिक्षण प्रमुख सूर्यकांत सोनवणे, सहाय्यक जिल्हा आयुक्त एन एम नवाब, सरचिटणीस कुसुम जाधव टेक्निकल हायस्कूल चे मुख्याध्यापक काकडे सर व इतर मान्यवर उपस्थित होते.  शाळेच्या प्राचार्या सौ जॉयसी जोसेफ  व विद्या प्रतिष्ठान यांनी विजेते विद्यार्थी-विद्यार्थिनी पालक व स्काऊट गाईड विभागाचे अभिनंदन केले.