जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धा

मध्यम गट- इयत्ता पाचवी ते सातवी – कुमारी जिया फिरोज तांबोळी – उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक.

या गटामध्ये पुणे जिल्ह्यातील 110 विद्यार्थ्यांचा समावेश होता.

बारामती येथे गुरुवार दिनांक 22 ऑगस्ट 2025 रोजी बाल रंगभूमी परिषद पुणे आयोजित सौ.
मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा 2025 आयोजित करण्यात आली होती. या तालुकास्तरीय
नाट्यछटा स्पर्धेत विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूल मधील
विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी
करत दैदित्यमान यश संपादन केले या स्पर्धेत बारामती तालुक्यातील विविध शाळांना आपला सहभाग
नोंदवला.
ही स्पर्धा गटनिहाय घेण्यात आली. या स्पर्धेत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनयाची
चुणूक दाखवून दिली स्पर्धेत अनुक्रमे इयत्ता नववी व दहावी या गटात कु. त्रिशा दीपक अलफुल्लायादव हिने
प्रथम क्रमांक
मिळवला .मध्यम गट म्हणजे इयत्ता पाचवी ते सातवी यामध्ये कु. आर्या अमर चेडे हिने प्रथम
क्रमांक तर चि. सोहम नवनाथ शिंदे याने द्वितीय क्रमांक
मिळवला तसेच चि. आदित्य दीपक येडे, कु.
अदिरा रवींद्र चौगुले, कु. जिया फिरोज तांबोळी तर लहान गट इयत्ता तिसरी व चौथी यामध्ये कु. प्रवीरा
विशाल रसाळ व कु. ओवी गणेश उबाळे या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण
केले.


या सर्व विद्यार्थ्यांची निवड पुणे जिल्हा या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय नाट्यछटा
स्पर्धेमध्ये निवड झाली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे खूप कौतुक होत आहे यांनी
विविध विषयांवर आपल्या नाट्यछटा सादर केले होत्या.
रविवार दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी ज्ञान प्रबोधिनी निगडी येथे जिल्हास्तरीय नाट्यछटा
स्पर्धा आयोजित केली होती या जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये याच विद्यार्थ्यांनी आपले संवादकौशल्य, अभिनय कौशल्य सादर केले

कुमारी जिया तांबोळी हिने उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक मिळविला या जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेमध्ये एकूण 150 शाळांनी आपला सहभाग नोंदविलेला.