Std X – SSC Result 2019

विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलची १००% निकालाची परंपरा कायम – ९५ % गुण मिळवून निखील वाघ विद्यालयात प्रथम

बारामती:- येथील विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलने महाराष्ट्र राज्य दहावी शालांत परीक्षेमध्ये १०० % निकालाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. मार्च २०१९ च्या दहावी परीक्षेसाठी एकूण १११ विद्यार्थी बसले होते. यापैकी ७३ विद्यार्थ्यांनी विशेष योग्यता श्रेणी, २३  विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १४ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली. विद्यालयातील निखील विष्णू वाघ ९५%, आदित्य जवाहरलाल सातपुते व तेजस म्हापजी शिंदे ९३.२% तर सिद्धेश महादेव चौधर ९३% गुण मिळवून विद्यालयाच्या नावलौकिकात भर टाकली.

विषयनिहाय निकाल पहाता तेजस म्हापजी शिंदे व दीप्ती शहाजी मराडे संस्कृत विषयात ९९ गुण, निखील विष्णू वाघ विज्ञान विषयात ९९ गुण, सिद्धेश महादेव चौधर गणित ९९ व हिंदी ९० गुण, रोहन राजकुमार गुटाळ समाजशास्त्र विषयात ९५ गुण, प्रांजळ शिवाजी लोखंडे मराठी ८६ गुण तर जुवेरीया शौकत बागवान इंग्रजी विषयात ७९ गुण मिळवत विद्यालयात त्या त्या विषयानुसार सर्वोच्च गुण प्राप्त केले आहेत.